Blog
तुम्हाला कधीही ‘एसईएम’ बद्दल ऐकलं आहे का? आणि त्याबद्दल अजून माहिती, सोप्या शब्दात जाणून घेऊ इच्छित आहात ?तर आपण मग योग्य ठिकाणी आहात. सर्च इंजिन मार्केटिंगचा परिचय आपण इथे करणार आहोत.
या मार्गदर्शकात आम्ही खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत
- एसईएम म्हणजे काय ?
- एसईएम का वापरावे ?
- एसईएम कधी वापरावे
- एसईएम कसे शिकायचे
- एसईएम प्लॅटफॉर्म
एसईएम म्हणजेच सर्च इंजिन मार्केटिंग आपण सर्वांनाच “सर्च इंजिन” कसं काम करते या बद्दल माहित असणे गरजेचे आहे.आपण इथे सर्च इंजिनच काम थोडक्यात समजून घेऊ
सर्च इंजिन
प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याने जवळजवळ दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे सर्च इंजिनच्या संपर्कात येत असतो. गुगल, बिंग, याहू ही सर्च इंजिनची काही उदाहरणे आहेत. आपण सर्च इंजिन विंडोमध्ये काही प्रश्न विचारला आणि सर्च बटण प्रेस केल्यानंतर आपल्याला संबंधित प्रश्नाची उत्तरे विविध स्वरूपात मिळतात. पुढील उदाहरण बघा

एसईएम म्हणजे काय?
एसईएम हा डिजिटल मार्केटींगचा एक भाग आहे. डिजीटल मार्केटिंग किंवा सोप्या भाषेत आपण ऑनलाइन मार्केटींग म्हणू शकतो. विविध उद्योगआधीपासून त्यांच्या व्यवसाय मार्केटींगसाठी डिजिटल मार्केटिंग वापरतात. सर्च इंजिन मार्केटिंग, या नावातूनच आपल्याला समजते की ‘सर्च इंजिन’ द्वारे अथवा त्याचा वापर करून विविध व्यवसाय आपली उत्पादने किंवा सेवा यांचे मार्केटिंग करतात.

दररोज अनेक इंटरनेट वापरकर्ते सर्च इंजिन द्वारे विशिष्ट उत्पादने / सेवा शोधतात आणि नंतर रीझल्ट पेजवर (एसईआरपी) त्यांना संबंधित उत्तरं मिळतात. या रीझल्ट पेजवर सर्च इंजिन काही विशिष्ठ स्लॉट मार्केटिंगकरिता उपलब्ध ठेवतात.या जाहिराती सर्च इंजिन अल्गोरिदम आणि डेटा बेसद्वारे तसेच विविध ब्रांडद्वारे सबमिट केलेल्या संबंधित जाहिरातींचे योग्य मुल्यमापन करून प्रदर्शित केल्या जातात.
एसईएम का?
एसईएमशी संबंधित बरेच प्रश्न अनेक जणांना पडतात. आम्ही आमच्या व्यवसायांसाठी एसईएम का निवडावे? आम्ही स्टार्टअप्स किंवा छोटे उद्योजक आहोत, तरीही आम्ही एसईएमचा विचार करू शकतो का? आमच्याकडे मार्केटिंगचेअनेक पारंपारिक मार्ग आहेत, तर आम्हाला एसईएमची आवश्यकता का आहे. इत्यादी.
एसईएमचे काही फायदे इथे आपण बघु,त्यामळे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आपल्याला समजून घेता येईल आपल्या साठी एसईएमचे किती उपयुक्त आहे
- ब्रँड अवेयरनेससाठी उपयुक्त
- आपण विशिष्ट प्रेक्षकांना लक्ष्य करू शकता
- आपल्या प्रेक्षकांपर्यंत वेगाने पोहोचा येते
- आपली जाहिरात मोहीम सहज मॅनेज करता येते
- केवळ युजर क्लिकसाठी शुल्क द्यावे लागते
- आपल्या ब्रांडच्या आवश्यकतानुसार आपण जाहिरातचे फॉरमॅट निवडू शकतो
वरील मुद्दे लक्षात घेऊन आणि आपल्या व्यवसाय मार्केटिंग गोलचा नीटअभ्यास करून आपण नक्की ठरवु शकतो की आपल्या व्यवसायासाठी एसईएमची निवड कश्याप्रकारे करावी.
एसईएम कधी वापरावे?
एसईएमचा मुख्य उद्देश तुमची वेबसाइट एसईआरपी(रिजल्ट) पेजच्या अव्वल स्थानांवर रँक करणे आहे. जेव्हा वापरकर्ते आपल्या उत्पादन / सेवांशी संबंधित क्वेरी शोधतात आणि जर त्यावेळी आपल्याला एसईआरपीच्या पहिल्या पेजवर आपल्या उत्पादनांचे प्रतिनिधित्व करायचे असेल तर आपण एसईओ किंवा एसईएम निवडू शकता.खरंतर या दोन्ही पद्धती डिजिटल मार्केटिंगचाच एक भाग आहेत. एसईओ आपल्या ब्रँडची व्हिजीबिलिटी वाढविण्यासाठी विनामूल्य टेक्निकस वापरतात परंतु दुसरीकडे ब्रँडची व्हिजीबिलिटी वाढविण्यासाठी एसईएम पेड टेक्निकस वापरते. जर या दोन्ही टेक्निकस योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरल्या तर मार्केटिंगकरता नक्कीच फायदेशीर ठरतात. एसईओ पद्धतीचा उपयोग करून सर्च इंजिनद्वारे अधिक व्हिजीबिलिटी मिळविण्यासाठी ब्रँड्सना अधिक वेळेची आवश्यकता लागते. तर दुसरीकडे एसईएम तंत्रे वापरुन ब्रँड त्यांच्या संभाव्य ग्राहकांसमोर त्याच्या सेवा अथवा प्रॉडक्ट्स लवकरात लवकर दाखवू शकतात.
एसईएमचा कसे शिकायचे?
एसईएमचा शिकण्यासाठी योग्य आणि संयोजित सामग्रीचा विचार केला पाहिजे. आपण मराठी भाषेला प्राधान्य देत असल्यास आणि मूलभूत एसईएम शिकू इच्छित असल्यास आपण इथे तपासून पहावे. मूलभूत(बिगिनर) एसईएम सामग्रीचा अभ्यास केल्यानंतर, आपण प्रत्यक्ष एसईएम जाहिरातीं तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, एसईएमचा शिकण्याचा हा उत्तम मार्ग आहे.प्रत्येक व्यवसाययासाठी त्यांचे प्रेक्षक हे वेग वेगवेगळे असतात व त्यानुसार विविध व्यावसायिक उद्दीष्ट असत , म्हणूनच एसईएम समजून घेण्यासाठी एसईएम प्रॅक्टिस सुरू करणे हा एक चांगला मार्ग आहे.
एसईएम प्लॅटफॉर्म
प्रत्येक सर्च इंजिन त्यांचे मार्केटिंग प्लॅटफॉर्म प्रदान करतो
सर्वाधिक प्रमाणात वापरलेले एसईएम प्लॅटफॉर्म हे गूगल अॅडस आहेत. या नंतर बिंग जाहिराती देखील त्याच हेतूसाठी वापरल्या जातात. त्यानंतर याहू आणि एमएसएन मार्केटिंग प्लॅटफॉर्म देखील प्रदान करतात.
गुगल हे सर्च इंजिन व्यापकपणे वापरलेला एसईएम प्लॅटफॉर्म आहे.गूगल अकाउन्ट स्ट्रक्चर खालील प्रकारे आहे.

गूगल जाहिराती क्लिक वेतन धोरणांवर काम करतात. दुसर्या शब्दांत आम्ही म्हणतो की हे पीपीसी मार्केटिंग आहे जेथे जाहिरातदार त्यांच्या जाहिरातींसाठी क्लिकच्या आधारावर पैसे देतात. जाहिरातदारांसाठी हा एक मोठा फायदा आहे. गूगल जाहिरातींचे इतर फायदे आपण येथे तपासू शकता.
आशा आहे की आपल्याला एसईएम म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये तिची भूमिका काय आहे हे समजले असेल.