Blog
ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय ? संपूर्ण माहिती जाणून घ्या.
- Posted by: Bharati
- Category: Email Marketing

नमस्कार, सध्या डिजिटलमार्केटिंग मार्केटिंगविश्वातील ट्रेंडिंग विषयापैकी एक आहे. आपला व्यवसाय वाढविण्याकरिता लहानांपासून ते मोठ मोठे उद्योजक डिजिटलमार्केटिंगचा वापर आपला व्यवसाय वाढवण्याकरिता करताना दिसत आहेत.आणि येणाऱ्या पुढील वर्षांत याचा वापर कैकपटीने वाढणार आहे. डिजिटल मार्केटिंगचे अनेक विभाग आहेत.एसइओ (SEO) ,एसईम (SEM),कन्टेन्ट मार्केटिंग,एसएमएम(SMM),मोबाईल मार्केटिंग आणि ई-मेल मार्केटिंग(ई-मेल-मार्केटिंग) . या मधील आपण ई-मेल मार्केटिंग बद्दल आज अधिक माहिती घेणार आहोत. चला तर समजून घेऊयात ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय आणि ई-मेल मार्केटिंग कशा पद्धतीने काम करते ते.
मार्केटिंगचा मूळ उद्दिष्टं हे आपला व्यवसाय वाढवणे आणि जास्तीस्त जास्त कस्टमर्स मिळवणे हाअसतो.प्रत्येक व्यवसायांच्या प्रकारानुसार मार्केटींग स्ट्रॅटर्जी बदलत असतात.जेव्हा कोणताही व्यावसायिक ई-मेल मार्केटिंग हा पर्याय त्यांचा मार्केटिंगसाठी निवडतो तेव्हा त्याला आपल्या व्यवसायानुसार काही स्ट्रॅटर्जी ठरवाव्या लागतात. सामान्यतः कोणते ई-मेल स्ट्रॅटर्जी लक्षात घेतल्या पाहितेजेत तेआपण इथे थोडक्यात समजून घेऊ
बेसिक ई-मेल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी
- ई-मेल मार्केटिंग संबंधित तुमचे टार्गेट ऑडियन्स आणि उद्दिष्ट ठरवणे
तुमच्या व्यवसाय संबंधित योग्य टार्गेट ऑडियन्स कोण असणार आहे ते ह्या स्टेज मध्ये ठरवायचं असतं. समजा एखादी स्पोर्ट्स मटेरील बनवणारी कंपनी आहे तर त्यांचे टार्गेट कोण असणार तर स्पोर्ट्स मध्ये असणारे मुले,असे मटेरियल विकणारे दुकानदार इत्यादी.तसेच ई-मेलमार्केटिंगचे मुख्य उद्दिष्ट इथे ठरवायचे असते
- तुमच्या ई-मेल मार्केटिंगसाठी योग्य सबस्क्रिबर्स मिळवणे
जसं आपण पहिल्या स्टेज मध्ये बघितलं त्यानुसार आपल्याला आपले कस्टमरचे ई-मेल ऍड्रेस मिळवायला लगतेत त्यानंतरच आपण ई-मेल मार्केटिंगला खऱ्या अर्थाने सुरवात करु शकतो.या करता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जसं तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म मधून तुमच्या व्हिसिटर्सचे ई-मेल ऍड्रेस जमा करणे.सोशिअल मिडिया एड्स अँड पेजेस वरून ई-मेल ऍड्रेस जमा करणे.
- तुमची ई-मेल कॅम्पिंऐन संबंधित कन्टेन्ट तयार करणे
तुमची ग्राहक ई-मेललिस्ट बनवत असताना.तुमच्या ई-मेलमार्केटिंगसाठीयोग्य कन्टेन्ट म्हणजेच माहिती लिहिणे आणि योग्य ई-मेल फॉरमॅट निवडणे हे सुद्धा महत्वाचे असते.ई-मेल बऱ्याच फॉरमॅट मध्ये तयार करता येतात जसं नुसते लिखित स्वरूपात,इमेजेस आणि टेक्स्ट फॉरमॅट,html फॉरमॅट,फक्त इमेजेस इत्यादी.तसेच योग्य कन्टेन्ट लिहणे हेदेखील तितकंच गरजेचेअसते.कन्टेन्ट मार्केटिंग संबंधित अधिकमाहिती मिळविण्या करता इथे क्लीक करा.
- ई-मेल टेस्ट करणे
जी ई-मेल मॉडेल तुम्ही तयार केले आहे ते योग्य रीतीने तपासणे देखील गरजेचे असते त्यावरून आपल्याला आपल्या ई-मेल मॉडेल तयार करताना झालेल्या चुका तपासता येतात
- योग्यवेळी ई-मेल पाठवणे
ह्या स्टेजला आपण आपले ई-मेल आपण तयार केलेल्या ई-मेललिस्ट ला पाठवतो.तुमच्या व्यवसाय आणि ई-मेल उद्दिष्ट लक्षात ठेवून व त्यानुसार योग्य वेळेचे नियोजन करून ई-मेल पाठवल्यास चांगले परिणाम मिळतात
- ई-मेल कॅम्पिंऐनचे परिणाम तपासणे
ई-मेल कॅम्पिंऐनचे परिणाम तपासून त्यात गरजेनुसार पुढे बदल केले तर ई-मेल मार्केटिंगचे अजून चांगले परिणाम आपल्याला मिळवता येतात.
ई-मेल मार्केटिंगकरीता आपल्या खालील ३ गोष्टी असणे गरजेचे असते
- तुमचा प्रोफेशनल ई-मेल
- ई-मेल सर्विस प्रोवाईडर अकाउंट
- ग्राहकई-मेल ऍड्रेस
या डिजिटल मार्केटिंग युगात ई-मेलमार्केटिंग किती उपयोगाचे आहे या बद्दल बर्याच लोकांना शंका असते.खरा तर योग्य नियोजनांनी केलेला ई-मेल मार्केटिंग हे इतर माध्यमांच्या तुलनेत कमी खर्चात खूप चांगले परिणाम मिळवून देते.ई-मेल मार्केटिंग अजूनही का मह्त्वाचे आहे ते इथे समजून घेऊ शकता.
बेसिक ई-मेल मार्केटिंग कोर्स
इथे आम्ही तुमच्याकरिता आपल्या मराठी भाषेमधून ई-मेल मार्केटिंगचा बिगिनर लेव्हलचा कोर्स घेऊनआलोआहोत तेही तुमच्या बजेट मध्ये.
या कोर्स मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?

ई-मेल मार्केटिंग कुणी शिकावं?
जसं मी वर म्हणाले, डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग ट्रेंड वापरण्ययासाठी बरेच उद्योजक पसंतीदेतआहेत. यासाठी काही व्यावसायिक स्वतः डिजिटल मार्केटिंग टीम बनवत आहेत किंवा डिजिटल मार्केटिंग कंपनींना हे काम दिलं जातआहे.किंवा काही व्यावसायिक स्वतः हे नवीन युगातलं मार्केटिंग शिकत आहेत.तर सामान्य स्टुडन्ट ज्यांना डिजिट मार्केटिंगमध्ये इन्टेरेस्ट आहे आणि वरील प्रमाणे करिअर संधी मिळवायच्या आहेत त्यांनी या कोर्सचा नक्की विचार करावा.तसेच जे व्यावसायिक ई-मेल मार्केटिंग त्यांच्या व्यवसायात इम्प्लिमेंट करु इच्छितात त्यांना सुद्धा हा मार्गदशक बनु शकेल.
कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्या करिता इथे क्लिक करा. धन्यवाद